जळगाव – दि.7 जानेवारी 2024 येथील शिवतीर्थ मैदाना जवळ सुरू असलेल्या आदिवासी कोळी बांधवांच्या न्यायहक्कांच्या मागण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र चे वतीने पाठींबा देण्यात आलाय. या संदर्भात बीआरएस पक्ष म्हणजेच भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र चे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांनी भेट देत दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी देखील कोळी बांधवांसाठी आम्ही रस्त्यावर उतरत रास्ता रोको kela होता. कोळी बांधवांच्या समस्या शासन प्रशासनाने तात्काळ सोडविल्या नाही तर राज्यभर बीआरएस पक्ष कोळी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव सोबत असेल असे ही यावेळी त्यांनी सांगितले आहे.
आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी पुंडलिक सोनवणे,प्रभाकर कोळी यांनी कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. यावेळी BRS जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे भेटी प्रसंगि भाऊसाहेब सोनवणे, दिपक तायडे, प्रल्हाद सोनवणे,नरेंद्र सोनवणे,कैलास सोनवणे,भगवान धनगर,नरेंद्र पाटील,युवराज सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी , जितेंद्र कोळी आणि बांधव उपस्थित होते .
उद्या दिनांक 8 जानेवारी सोमवारी सकाळी 11 वाजता शिवतीर्थ मैदानावरून कोळी बांधवांचा मोर्चा निघणार असून, कोळी समाजाच्या या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तो धडकणार आहे. यात जिल्ह्यातील सर्व समाज बांधव सहभागी होतील असे भाऊसाहेब सोनवणे यांनी सांगितले.
शिवतीर्थ मैदानासमोर न्याय हक्कांच्या साठी असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. “ विनाअट आदिवासी कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे तसेच जातपडताळणी समितीचे कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे. यांसह विविध दहा मागण्यांसाठी आदिवासी कोळी जमातीच्या पदाधिकार्यांनी आदिवासी कोळी समाजा तर्फे शिवतीर्थ मैदानावर अन्नत्याग सत्याग्रह सुरु आहे . कोळी बांधवांच्या या लढ्यास बीआरएस पक्ष म्हणजेच भारत राष्ट्र समिती राष्ट्रीय अध्यक्ष यांचे वतीने आम्ही पूर्ण पाठींबा देत आहोत.












