आदिवासी वनहक्क वनदावेरांना अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान भरपाई द्यावी!! संजीव शिरसाठ जिल्हा सरचिटणीस लोक संघर्ष मोर्चा…

0
41

चोपडा ::असे निवेदन प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजीव शिरसाठ,अध्यक्ष आदिवासी बहुउद्देशीय संस्था, जिल्हा सरचिटणीस लोक संघर्ष मोर्चा,

देवसिंग पावरा, गुलाब बारेला,यासु बारेला, गनदास बारेला,खुमसिंग बारेला, रुपसिंग पावरा,संजय बारेला,पारसिंग बारेला,रणदास बारेला, प्रताप बारेला यांनी
चोपडा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वनहक्क कायदा (वनहक्कची मान्यता २००६/२००८ वसुधारित अधिनियम २०१२ नुसार अतिक्रमणं केलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी वनदावे आपल्या कडे दाखल केलेले असुन त्यदाव्यांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही सदर प्रलंबित दावेदार हात्या जमिनीवर २५ ते३० वर्षांपासून शेती करुन आपली व कुटुंबा ची उपजिवीका भागवत असुन त्यावर उदरनिर्वाह करित आहे.प्राप्त,अंशदा,व प्रलंबित वनदावेदारांचे आदिवासी समाजाचे/ लोकांचे यावर्षी पावसाळी हंगामात फार मोठ्या प्रमाणावर पावसाळी पाण्यात आदिवासी वनदावेरांचे शेतात अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान झाले आहे.त्यात प्रामुख्याने शेतातील मुग, उडीद,तुर कापूस,व ज्वारी पीक कापणी वर आलेले असतांना तोंडी आलेला घास निसर्गाने आमच्या आदिवासी ग्रामस्थांकडून हिसकावुन घेतला आहे.त्यात पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.आदिवासी शेतकरी यांनी पेरणी ,मशागत, खते बियाणे यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.व मेहनत करून पीक वाढवले होते या अतिवृष्टीमुळे त्यांचं मोठं नुकसान होवुन त्यांना मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसानीची झळ पोहोचली आहे.त्यामुळे आदिवासी समाजाच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे.त्याच्यावर अशी उपासमारीची वेळ येवू नये म्हणून प्रशासनाने त्यांना नियमानुसार सर्व वनहक्क दावेदारांना त्वरित दुष्काळ अनुदान उपलब्ध करून करुन त्यांना आर्थिक मदत मिळावी.
निवेदन देताना महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शेंकडों च्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Spread the love