दिपक नेवे
यावल -नवरात्री म्हटलं म्हणजे महिला भगिनी साठी नऊ दिवस नऊ रंगाच्या नऊ रंगीबिरंगी साड्या परिधान करण्याच्या उत्सव म्हणून साजरा करतात पण कधी आपण ह्याच साडी मधून जर एखादी साडी ज्या एखाद्या गरीब महिला भगिणीला दिली तर नक्कीच तुमची नवरात्र सफल झाल्याशिवाय राहणार नाही याचं अनुसागने दहिगाव गावातील शिवशंभू संघटना युवती तालुका अध्यक्ष कविता पाटील हिने दसऱ्याच्या दिवशी आदिवासी पाडा नागदेवी येतील झोपडपट्टीवरील महिला चा नवरात्री निम्मित साडी चोळी देऊन सन्मान केला व त्याच्या लहान मुलांना खाऊ वाटप करून त्याच्यासोबत दसरा साजरा केला यावेळी रवींद्र पाटील,दिव्या पाटील,नीलम महाजन,योगेश पाटील आणि कल्पेश पाटील उपस्तित होते .












