ट्रकची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती जखमी

0
17

पारोळा -: येथील राष्ट्रीय महामार्ग सहावर बायपासवरील म्हसवे ट्रकने फाट्याजवळ दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

रूपाली शुभम बोरसे (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव असून शुभम भाऊसाहेब बोरसे (वय २५) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, दुचाकी (एमएच १९, सीके ६२५२) ने २ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शुभम बोरसे व रूपाली बोरसे हे दांपत्य जळगावकडे जात होते. या वेळी महामार्ग सहाच्या बायपासवर म्हसवे फाट्याजवळ रस्ता क्रॉस करताना ट्रक (एचआर ५८, एफ १३१३) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात रूपाली बोरसे यांना डोक्याला, तोंडाला व कमरेस गंभीर इजा झाली तर शुभम बोरसे यांच्या पायाला, तोंडाला गंभीर इजा झाली आहे.

त्यांना रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूपाली बोरसे यांना तपासून मृत घोषित केले. तर शुभम बोरसे यांना गंभीर इजा झालेली असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पो.नि. अशोक पवार, हवालदार डॉ. शरद पाटील, मिथुन पाटील यांनी भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली. याबाबत पुरुषोत्तम बोरसे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात ट्रक चालक वसीम इरफान राजपूत (रा. चौरादेव, ता. जि. सहारनपुर, उ. प्र) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डॉ. शरद पाटील करत आहेत.

Spread the love