जळगाव येथील खून प्रकरणातील दोघे संशयित मालवण मधून ताब्यात

0
14

जळगाव – येथील किशोर सोनवणे खून प्रकरणात फरार असलेल्या दोघा संशयित आरोपींना मालवण – कुंभारमाठ येथे पकडण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

अमोल कोळी (३०) व निलेश सपकाळे (३५) दोघे रा. शनिवार पेठ जळगाव अशी त्यांची नावे आहेत. यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर यांनी तब्बल ६३ किलोमीटर पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. ते घटनेनंतर काहि दिवस सावंतवाडी तालुक्यातील आजगाव परिसरात लपून बसले होते.

याबाबतची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले होते. मात्र पोलिसांचा सुगावा लागल्यानंतर ते मालवणच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले.

मात्र या संशयित आरोपीचा पाठलाग करून कुंभारमाठ मालवण येथे ताब्यात घेण्यात आले.हा खुनाचा प्रकार दोन महिन्यापूर्वी जळगाव येथे पूर्व वैमनस्यातून ७ ते ८ तरुणांनी किशोर यांची एका हॉटेलमध्ये घुसून हत्या केली होती. हा प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुढे आला होता. दरम्यान त्यातील ४ संशयित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर अन्य काही जण फरार आहेत. त्यातील दोघे प्रमुख सूत्रधार हे आजगाव येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जळगाव पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत होता.परंतु पोलिसांचा सुगावा लागल्यामुळे ते दोघे कार गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्नात होते.मात्र पोलीस वालावलकर यांनी आपल्या गाडीने पाठलाग करून त्यांना कुंभारमाठ येथे ताब्यात घेतले आणि जळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Spread the love