‘त्या’ नराधमाची पोलिस कोठडीत रवानगी

0
49

गोंडगाव (ता. भडगाव) येथील सातवर्षीय बालिकेवर जबरी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अटकेतील संशयित सोनू ऊर्फ स्वप्नील पाटील याची जिल्‍हा न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

भडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोंडगावात सातवर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. चार दिवसांनंतर घराजवळील खळ्यात कडब्याच्या गंजीत तिचा मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणी स्वप्नील ऊर्फ सोनू याला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याला शुक्रवारी (ता. ४) जळगाव जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा यांनी गुन्ह्यातील अचूक तपास आणि पुरावे संकलित करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी लावून धरली.

न्यायालयाने सरकार पक्षाची मागणी ग्राह्य धरून संशयित सोनू ऊर्फ स्वप्नील विनोद पाटील याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Spread the love