सुनसगाव येथील उल्हास ठाकूर यांची चार जिल्ह्यांच्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पदी नियुक्ती

0
40

सुनसगाव – येथील रहिवाशी व सध्या मंत्रालयात ओएसडी  (विशेष कार्यकारी) म्हणून सेवा देत असलेले उल्हास प्रल्हाद ठाकूर यांची पदोन्नती झाल्याने त्यांच्या कडे नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव अशा चार जिल्ह्यांत क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (कृषी) पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

उल्हास ठाकूर यांनी आता पर्यंत कृषी अधिकारी म्हणून मुरबाड जि. ठाणे, भुसावळ जि जळगाव तसेच धुळे जिल्हा क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे, विजयकुमार गावित, संजय सावकारे व जयकुमार रावल यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. ते येथील प्रकाश हायस्कूल सुनसगाव चे सेवानिवृत्त कर्मचारी प्रल्हाद ठाकूर यांचे चिरंजीव तर काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक अनिल ठाकूर यांचे बंधू आहेत.

Spread the love