जळगाव संदेश न्यूज नेटवर्क
धरणगाव:- गावात व ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामासाठी चार हजार सहाशे त्यानंतर बारा हजार रु. असे प्रत्येक परिवाराला शौचालय बांधकामासाठी देण्यात येत होते व आज ही देण्यात येत आहे त्याच अनुषंगाने झुरखेडा ग्रामपंचायत मार्फत देखील ही योजना राबविण्यात आली खरी मात्र यात झुरखेडा ग्रामपंचायत मध्ये दि.५ फेब्रु. २०२२ रोजी गावातील तक्रारदार सुरेशआप्पा पवार (पाटील) सामाजिक कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बोरसे ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी केली असता त्यात केंद्र शासनाकडून प्रत्येक परिवारासाठी शौचालय बांधकामापोटी पासबुकप्रमाणे आलेली रक्कम ११५२०००/- रु. अशी आहे यात उमेश गोविदा पाटील, रविंद्र दगडू पाटील व ग्रामपंचायत झुरखेडा या नावाने चेक काढण्यात आल्याचे दिसून आले आहे व १४ वा वित्त आयोगाच्या रक्कमेचा व खर्चाचा कोणताही हिशोब नसल्याचे अथवा ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ,दलीवस्ती चे कामे व खर्च त्यानंतर ग्रामपंचायतचे सर्व दफ्तर गहाळ असल्याचे चौकशी तुन समोर आले आहे आता हे दफ्तर गहाळ झालं की स्वतःच्या फायद्यासाठी करून करून टाकलं हे तर ग्रामसेवकच सांगू शकतील पण त्यांनाही पंचायत समिती धरणगाव येथून ग्रा पं दप्तर/ अभिलेखे संबधिताकडुन मिळविणेसाठी/जप्त करणेसाठी महाराष्ट्र ग्रां प अधिनियम १९५८ चे कलम १७९ प्रमाणे प्रशासनाने वेळोवेळी लेखी स्वरूपात नोटीस पाठवली आहे असे विस्तार अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे व लेखिस्वरूपात त्यांच्या कडून खुलासा देखील मागविण्यात आल्याचे दिसून आले आहे. तरी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केल्याचे दिसून आलेले नाही त्यामुळेच अश्या लोकांना प्रशासनाचा कुठलाही धाक नाही असे दिसून येत आहे पण मा जिल्हाधिकारी यांनी ग्रामसेवक व उपसरपंच व आत्ताचे प्रभारी सरपंच यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेशच त्यांनी पारित करावे जेणे करून अश्या कर्मचाऱ्यांना चपराक बसेल व प्रशासनाचा धाक राहील नाहीतर ते गावोगावी नोकरी कामी जात राहतील आणि चोऱ्या करून दप्तर गहाळ करीतच राहतील, म्हणून त्यांनी त्यांचे निलंबन तात्काळ करावे अशी मागणी आता केली जात आहे व दुसरे असे की, उपसरपंच व आताचे प्रभारी सरपंच सौ मंगलाबाई रविंद्र पाटील यांनी त्यांच्या पतीच्या नावे एप्रिल २०१८ रोजी चेक द्वारे रक्कम अदा केल्याचे चौकशीतून समोर आल्याचे दिसून येत आहे.
झुरखेडा ग्रामपंचायत अथवा ठेकेदार यांच्या कडे लाभार्थी यादी रक्कम अदाची पावती (व्हाउचर नंबर) फोटो असे कोणतेही कागदपत्रक चौकशी वेळी आढळलेली नाही तसेच त्यांना एवढे मोठे काम करतांना ग्रामपंचायत अथवा प्रशासनाने त्यांना कोणत्या आधारे काम दिले हे ही पाहणे तेवढेच महत्वाचे दिसून येत आहे. त्यामुळे ठेकेदार उमेश गोविंदा पाटील , रविंद्र दगडू पाटील व ग्रामपंचायत झुरखेडा यांचेकडून संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत झुरखेड्याचे त्यावेळचे उपसरपंच व आत्ताचे प्रभारी सरपंच सौ मंगलाबाई रविंद्र पाटील हे असून त्यांनी देखील त्याचे पती रविंद्र दगडू पाटील यांच्या नावे चेक काढण्यास सहकार्य केले त्यांचा पदाचा दुरुपयोग केला त्यामुळे त्यांचे पद रा.प.अधिनियमांचे कलम १४ (ग) प्रमाणे कारवाईस पात्र असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे. अशी मागणी सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी आपल्या पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.