धरणगाव – वृक्षारोपण करतांना श्री.विवेक होशिंग , श्री.विजय वाणी श्री.राम भरकड , श्री.जमील देशपांडे , श्री.डॉ.बेंद्रे , श्री.विशाल मकवाने ( संयुक्त आयकर आयुक्त ) , श्री.शकील अन्सारी ( उप आयकर आयुक्त ) , श्री.कृष्णमुर्ती अय्यर , श्री.अनिल जसोरीया , श्री.महिपाल सिंह , श्री.राकेश रंजन , श्री.मनिष भगत
जळगाव:- दि .१८ सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव या अभियानांतर्गत आयकर विभाग आणि मराठी प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मेहरुण तलावा जवळ निसर्गरम्य परिसरात २०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त श्री.विजय वाणी , श्री.विवेक होशिंग ( उपवन संरक्षक , जळगाव वनविभाग ) , श्री.राम भरकड ( अन्न व औषध निरीक्षक ) , मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड.श्री.जमील देशपांडे व डॉ.श्री.बेंद्रे उपस्थित होते . श्री.विशाल मकवाने ( संयुक्त आयकर आयुक्त ) आणि श्री.शकील अन्सारी ( उप आयकर आयुक्त ) यांनी तुळशीचे रोप भेट देवून पाहुण्यांचे स्वागत केले . ह्या प्रसंगी वृक्षारोपणाचे महत्व विशद करतांना श्री.विजय वाणी म्हणाले की , वृक्षारोपण करुन आपण सृष्टी निर्मितीत योगदान देऊ शकतो . श्री.विवेक होशिंग म्हणाले की , झाडे कमी लावली तरी चालतील परंतु लावलेल्या झाडाचे संगोपन व संवर्धन व्यवस्थित करा . श्री.विशाल मकवाने यांनी आलेल्या सर्व मान्यवरांना आश्वस्त केले की सर्वझाडांची संगोपनाची जबाबदारी आयकर विभाग व मराठी प्रतिष्ठानच्या सहाय्याने निश्चित पूर्ण करणार श्री.एन.कृष्णमुर्ती अय्यर ( आयकर अधिकारी ) यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले . कार्यक्रमास हजर आयकर अधिकारी श्री.अनिल जसोरीया , श्री.महिपाल सिंह , श्री.राकेश रंजन , श्री.मनिष भगत आणि सर्व आयकर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयकर कार्यालय अधिक्षक श्री.सुनील माने , आयकर कर्मचारी , रोजंदार कमचारी व माळीकाम करणारे श्री.धांडे यांनी विशेष परीश्रम घेतले












