प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: आम्ही पोलीस आहोत ,तुम्हाला मी सीटी मारली , तुम्ही थांबले का नाहीत, या रस्त्याने म्हातारीला लुटले आहे ,एवढे काय सोने घालून तुम्ही चालले आहेत ते सोने काढा ! असे सांगून दोन अनोळखी व्यक्तींनी सोने लुटून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी वसंत जगन्नाथ पाटील रा.वेडीमाता मंदीर खळवाडी, आदर्शगल्ली भुसावळ व साक्षीदार यांची अँक्टीवा गाडी थांबवून सोने व कागदपत्रे गाडीच्या डिक्कीत ठेवत हातचलाखीने रुमालात फक्त कागद ठेवले व २,६५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने दोन अनोळखी इसमांनी संगनमत करुन लुटल्याची घटना दि.५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भुसावळ औष्णिक विद्युत प्रकल्प दिपनगर ला लागून असलेल्या बसस्टँड समोर हायवे रोडवर घडली.
पुढील तपास पोनि महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नंदकिशोर काळे हे करीत आहेत.