केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी आजचा दिवस महत्वाचा

0
35

सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांना नुकतीच अटक झाली हाेती. त्यानंतर न्यायालयाने जामीन देताना त्यांनी दाेन तारखांना गुन्हे शाखेत हजेरी लावावी असा आदेश दिला हाेता. त्यानूसार आज (साेमवार, ता. ३० आॅगस्ट) राणेंनी महाड येथील गुन्हे शाखेत त्यांची हजेरी लावणे अपेक्षीत आहे. परंतु त्यांना दिल्लीहून बाेलावणे आल्याने ते आजच दुपारी १२ वाजता रवाना हाेणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आराेप करीत शिवसेनेने पहिली तक्रार नाशिक येथे नाेंदवली गेली. तेथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जन आशीर्वाद सुरु असतानाच संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथे राणेंना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात नेण्यासाठी रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रायगड पोलिसांनी राणेंना महाड न्यायालयात हजर केले हाेते. त्यावेळी दिलेल्या आदेशात त्यांनी आज (साेमवार) गुन्हे शाखेत उपस्थिती लावावी असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान मंत्री नारायण राणे यांचे आराेग्य विषयक प्रमाणपत्र महाडच्या गुन्हे शाखेत पाठविले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे मंत्री नारायण राणे हे गुन्हे शाखेत प्रत्यक्ष हजेरी लावणार नाहीत असेही स्पष्ट हाेत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दुपारी १२ नंतर गाेव्याहून दिल्ली रवाना हाेणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आजचा दिवस हा राणेंसाठी महत्वाचा मानला जात आहे. ते गुन्हे शाखेत उपस्थित राहणार की थेट दिल्लीला जाणार हे दुपारी १२ ते तीन या कालावधीनंतर स्पष्ट हाेईल.

Spread the love