चोपडा – बुधगाव येथील रहिवासी उर्वेश साळुंखे यांनी संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त चोपडा येथे नगरपरिषद समोर पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती केली.
सकाळी ठिक 11 वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नागरिकांन मध्ये जनजागृती करत असताना लक्ष वेधण्यासाठी उर्वेश साळुंखे यांनी सर्व प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या अंगावर लावले होते. स्वच्छता केली पाहिजे व प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे यांचे पत्रिका छापून नागरिकांन मध्ये वाटप केली. लोकांना स्वच्छतेचे व प्लास्टिकचे महत्व सांगण्यात आले. निवेदनावर पाठिंबा दर्शविण्यासाठी नागरिकांनी असंख्य सह्य केल्या. या नंतर दुपारी 2.30 वाजता तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना व मुख्याधिकारी नगरपरिषद चोपडा यांना निवेदन देण्यात आले. या अनोखा पर्यावरण बचाव जनजागृती आंदोलनाला असंख्य नागरिकां सह माजी विधानसभा अध्यक्ष अरूण भाई गुजराती, मा.आमदार कैलास पाटील , चो.का.सा चेअरमन चंद्रहास गुजराती,अजितदादा समर्थक सुनील पाटील, वाळकी, चो.सा.का मा. चेअरमन घनशाम पाटील, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील चो.का.सा. संचालक शशिकांत देवरे, जितेंद्र वाघ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तुकाराम पाटील, समाधान माळी, सौरभ ठाकरे, उदय धनगर, मयुर पाटील शेतकरी संघटना संदिप पाटील, प्रवीण गुजराती, मनीष गुजराती, कांतीलाल पाटील व या जनजागृती चे कौतुक म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव सोनवणे यांनी सत्कार केला सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या जनजागृती आंदोलनाला प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठवण्यात आले.