चोपडा – गेल्या दिड वर्षांपासून देशातील महाविद्यालय बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसीचा पुरवठा करत असुन. त्या पुरवठ्यानुसार लसीकरण होतं आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणार पुरवठा या मध्ये सातत्याने तफावत आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसीचा स्वतंत्र पुरवठा करुन. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे. अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची आहे. हि मागणी पूर्ण होई पर्यंत विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागीय अध्यक्ष विद्यासागर घुगे, जिल्हा अध्यक्ष रोहन सोनवणे यांच्या सुचणे प्रमाणे सर्व विद्यार्थी आपल्या भागात लोकशाही मार्गाने विविध स्वरूपात आंदोलन करणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चोपडा तालुका अध्यक्ष उर्वेश साळुंखे यांनी दिली.