डेहराडून : – उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीनंतर गुरुवारी तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू होते. आज ७० जणांना वाचविण्यात यश आले तर अद्याप ५० हून अधिक जण बेपत्ता आहेत, अशी माहिती लष्कराने दिली.
उत्तराखंडमध्ये धराली गावाजवळ मंगळवारी झालेल्या ढगफुटीनंतर पूरसदृश निर्माण झाली होती. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. बचाव पथकाला काल दोन मृतदेह सापडले. परंतु हे मृतदेह या चार मृतांपैकी आहेत की नाही. हे स्पष्ट झाले नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या ६५ लोकांना येथून ४३२ किमी अंतरावर असलेल्या माटली शहरात विमानाने हलवण्यात आले, असे प्रशासनाने सांगितले. या पुरामुळे सर्वाधिक सर्वात जास्त नुकसान झालेल्या धराली गावात ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साहित्य विमानाने पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय लष्कराने इतर अधिकाऱ्यांशी समन्वय साधून धराली आणि जवळच्या हर्षिलमध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) विभागाचे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते खचल्यामुळे अनेक भागाचा संपर्क तुटलेला आहे. आतापर्यंत ७० नागरिकांना वाचविण्यात आले असून ५० हून अधिक बेपत्ता आहे, असे लष्कराने येथून प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्राचे अद्याप १५ ० पर्यटक
मुंबई, ता. ७ : उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भूस्खलन पूरस्थितीमुळे त्या ठिकाणच्या विविध भागात महाराष्ट्रातील १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली. त्यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला आहे. हे पर्यटक आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिवांशी फोनद्वारे चर्चा केली आहे.