वडती येथे लसीकरण करतांना वैद्यकीय कर्मचा-यांची मनमानीसोयीच्या लोकोना लसीकरण करण्यासाठी आटापिटा. !

0
18

हेमकांत गायकवाड

चोपडा -लसीकरण साठी गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारे वडती या गावात लसीकरणासाठी गोरगावले प्राथ.आरोग्य केन्द्रांचे संबंधीत डॉक्टर कर्मचारी वडती ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोविड १९ , लसीचे डोस देण्याकामी अवेळी आले असता, अनेकांना समजलेच नाही; आज आपल्या गावात लसीकरण आहे. तुम्ही कोणत्याही लोकप्रतिनिधींना व ग्रामस्थांना सुचना न् देता अचानक येवून लसीकरण करताय कसे ? असा प्रश्न उपस्थीत दोन चार लोंकानी. संबंधीतांना विचारला. परंतू प्रश्नाचे निरासन न् करता त्यानी उध्दटपणाने उत्तरे दिली व म्हटले आम्हाला सकाळी ८:०० वाजेला लस हातात मिळते तेव्हा समजते कुठल्या गावाला लसीकरण आहे.

जर कर्मचा-ंच्या सांगण्यावरून खरच सांगितल्या वेळेला लसीकरणाचे ठिकाण कळत असेल ! तर मग वडती येथे बाहेर गावाचे लोक ६ ते ७ वाजेपासून गावात येवून कसे काय बसले होते ? हाच प्रश्न गावक-यांनी विचारल्यावर मात्र संबंधीत पथक आवआणून उत्तर देत होते. लसीकरण गावाच्या लोकांसाठी होते का ? सोयीच़्या लोकांसाठी होते . हेच ग्रामस्थांना कळत नव्हते. लसीकरणाचा अधिकार ज्या लोकांना तेच लोक वंचित राहत असतील तर जण जागरण करून काय फायदा.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. हा धोका

टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र सध्या तरी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावलेला दिसतो.

मात्र येथील परिस्थिति तर वेगळीच आहे. मनमानीचा भार जास्त दिसतोय. जाब विचारला तर आम्ही येथून निघून जावू लसीकरण येथे होणार नाही, नाही तर पोलीसांना बोलवू अशी दमदाटी देखील बोलण्यातून अधूनमधून जाणवते. यात वरिष्ठ वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या पुर्णत: समर्थनाच्या पाठबळामुळे कर्मचा-यांची हि भाषा होती. लसीकरणासाठी सोयीच्या लोकांना लस देता यावी यासाठी तर हा खटाटोप नसावा अशी शंका देखील याठिकाणी उपस्थिती होते.

या बाबत गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैदयकीय अधि. डॉ. लोमटे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून लसीकरण ठिकाणाची परिस्थिती बद्दल विचारले असता. त्यानी पण कर्मचा-यांची बाजू घेत उत्तर दिले . सरळसरळ सोयीच्या लोकांना लसीकरण करणे , हाच याचा अर्थ लावावा का ? असेच प्रकार होत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडे जावे . अशा बेजबाबदार कर्मचा-यांवर वरिष्ठांचा जरब नसल्याने बेलगाम परिस्थिति येते.

जिल्हा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज होवून गेलेली आहे.

Spread the love