वढोदा येथे तरुण शेतकऱ्यांच्या वतीने सह्याद्री फार्म यांच्यामार्फत केळी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन.

0
46

हेमकांत गायकवाड

चोपडा : तालुक्यातील केळी पिकासाठी ओळखला जाणारा भाग म्हणून वढोदा गावाची ओळख आहे. वढोदा गावाची तरुणाई शेतीकडे एकवटली असून येथील तरुण शेतकरी यांची शेतीकडे यशस्वी वाटचाल जोमाने सुरू आहे. वढोदा येथील केळी हे प्रामुख्याने घेतले जाणारे पीक.उच्च दर्जाची केळी येथे लागवड केली जाते .आधुनिकरण व तंत्रज्ञान यांच्या संगोपनने वढोदा २१ ते ३५ या तरुण वयोगटातील युवा शेतकऱ्यांनी एक यशस्वी अशी वाटचाल सुरू केली आहे. आपल्या केळीला दर्जेदार भाव मिळावा व ती विदेशात निर्यात केली जावी व योग्य दर मिळावा यासाठी तरुणाई एकवटली आहे.

त्यात डॉक्टर ,इंजिनिअर व उच्च शिक्षण घेतलेले तरुण मंडळी सध्या एकोपा करून नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध घेऊन केळीचे योग्यप्रकारे उत्पादन घेत आहेत.मागील दोन महिन्यात पाच कार्यशाळेचे आयोजन करून तरुणाईने यशस्वी वाटचाल सुरु केली आहे.गावातील तरुणाईने एफ पी सी (farmer producing company ) स्थापित करण्याच्या तयारीत आहेत.यात तरुण शेतकरी सभासद सहभागी होत आहेत. डॉ निलेश, संदीप पाटील ,शेखर पाटील, समाधान पाटील,शैलेश पाटील,राजेश पाटील, अरुण पाटील,विकास पाटील, अविनाश पाटील, पद्माकर पाटील, जीवन पाटील,मिलिंद सूर्यवंशी , प्रमोद पाटील, चंद्रशेखर पाटील. व समस्त ग्रामस्थ शेतकरी यात सहभागी झालेले आहेत..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील व वैभव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व तरुण शेतकरी यांच्या मार्फत करण्यात आले…

Spread the love