वाघुळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराने ग्रामस्थ त्रस्त

0
30

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – मलकापुर तालुक्यातील वाघुळ गावच्या वार्ड नंबर दोनच्या बस स्टँड जवळील रस्त्याची ग्रामपंचायती कडे दहा ते पंधरा वेळा तक्रार करूनही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच वाघुळ गावातील सरपंच , उपसरपंच आणि सदस्य यांच्या घराजवळील रस्ते यांच्या नातेवाईकांची घरकुल बांधून घेतले काही लोकांनी एका घरात दोन घर घेऊन एकच घर बांधले असा बराच भ्रष्टाचार वाघुळ ग्रामपंचायत करत असल्याची चर्चा सुरू आहे. गरजू लोकांना अजून गावात घर मिळाले नाही ? गावामध्ये आठ आठ दिवस पाणी पुरवठा होत नाही. पाण्याची टंचाई आहे .

रस्त्याने नागरिकांना जाता येत नाही या बाबत वाघुड ग्रामपंचायतला काहीही सोयरेसुतक नाही त्यामुळे काम होत नसतील तर गावामध्ये उभे राहून पद घेऊन गावाचं नुकसान करून घेऊ नये असं नागरिकांचे म्हणणं आहे. मागच्या वर्षी सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घराजवळच मुरूम टाकून ग्रामपंचायत कडून जास्त बिल काढले असून ग्रामसेवक सुद्धा यामध्ये सामील असल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे . गावातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे .लवकरात लवकर गावातील रस्ते चांगले करून गावकऱ्यांना जाण्या येण्यासाठी मार्ग चांगला करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष दिले तर बरे होईल. अशी अपेक्षा त्रस्त वाघुळ गावकऱ्यांनी केली आहे.

Spread the love