वेले येथुन पंढरपूर संकीर्तन पालखी पायी दिंडीचे आयोजन.. वारकर्‍यांनी सहभाग नोंदवावा..जगन्नाथ बाविस्कर

0
42

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेलेआखतवाडे येथुन आषाढीवारी निमीत्त श्रीक्षेत्र पंढरपुर साठी संकीर्तन पालखी पायी दिंडी निघणार असुन दिंडीचे आयोजन ह.भ.प.किशोर पाटील महाराज, ह.भ.प.निलेश महाराज (सोनखेडीकर) व वेले येथील वारकरी ग्रामस्थं मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.तालुक्यातील ह.भ.प.वारकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन अाध्यात्मिक धार्मिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, १ जून रोजी वेले येथे रात्री दिंडी प्रस्थानची कीर्तनसेवा होईल. २ जुन रोजी दिंडी मार्गस्थं होऊन सोनखेडी (ता.अमळनेर) येथे पहिला मुक्काम होईल. ३ जून पासून दरकोस दरमुक्काम करीत २८ जून रोजी दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कालिका मंदिर चौकातील श्री नानाबुवा वडगावकर यांच्या मठात पोहोचेल.तेथेच २ जुलै पासून ह.भ.प.किशोर पाटिल महाराज (सोनखेडीकर) हे संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण कथेचे निरूपण करतील.१० जुलै रोजी आषाढी एकादशीला श्री विठुमाऊलींचे दर्शन घेऊन पारणे फेडुन ही दिंडी परतीच्या प्रवासाला निघेल.दिंडीत गायनाचार्य निलेश महाराज सोनखेडी,गणेश महाराज लासुर,राजू महाराज लोणी, पप्पू महाराज काजीपुरा, भागवत महाराज नगरदेवळा यांची साथसंगत राहिल. चोपदार म्हणुन लिलाधर महाराज गडखांब,डिगंबर खैरनार दुसाने यांची जबाबदारी राहिल.यावेळी वेले व सोनखेडी पंचक्रोशीतील भजनी मंडळांचेही विशेष सहकार्य लाभणार आहे,अशी माहिती गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली आहे.

वारकऱ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे..

दिंडीत वारकऱ्यांना मोफत प्रवेश,चहापाणी,नाश्ता,जेवणाची सुविधा राहील.सोबत आवश्यक साहित्यासह औषधी घ्यावी.मौल्यवान वस्तू व लहान मुले आणू नयेत.कोरोना संदर्भातील नियम व सुचनांचे पालन करावे.नैसर्गिक आपत्तीची वैयक्तिक जबाबदारी राहिल. नावनोंदणी साठी आधारकार्ड,पासपोर्ट फोटो व मोबा.नंबर आवश्यक राहिल.(संपर्क मोबा.नं.९८६००६४४८२).दिंडीत वारकऱ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे.व सहकार्याची भावना ठेवावी.

ह.भ.प.किशोर महाराज भागवताचार्य सोनखेडी,ता.अमळनेर

Spread the love