प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – सध्या गुरेढोरे चोरी करणाऱ्या टोळक्याने डोके वर काढले असून याचा फटका नशिराबाद व वांजोळे येथील शेतकऱ्यांना बसला आहे. भुसावळ तालुक्यातील वांजोळे येथील किशोर देवराम सावळे यांच्या मालकीची ८० हजार रुपये किंमतीची तसेच भवानी पेठ नशिराबाद येथील राजेंद्र धनगर यांच्या मालकीची एक म्हैस, एक रेडा आणि एक लहान पारडू असे दिड लाख रुपये किंमतीची गुरे चोरीला गेली असून संबंधीत शेतकऱ्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.