वराडसिम विद्यालयाची अर्चना भारंबे ची राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड.

0
51

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील पंडित नेहरू विद्यालय वराडसीम ची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी अर्चना रविंद्र भारंबे हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेली असून ती जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी ती सांगलीला रवाना झाली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. खेडकर सर यांच्या हस्ते अर्चना हिचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे अर्चना हीस तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तिला मुख्याध्यापक श्री. एस. एस. खेडकर सर व क्रीडा शिक्षक श्री. एन.डी. राजपूत सर यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडी मुळे वराडसिम गावाचे नाव राज्यावर झळकणार असून अर्चना भारंबे च्या माध्यमातून वराडसिम गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Spread the love