प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वराडसिम विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणूक ग्रामस्थांच्या व सभासद शेतकऱ्यांच्या एकजुटीने बिनविरोध झाली होती संपूर्ण १३ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवड बिनविरोध होणार यावर शिक्का मोर्तंब झाला होता आणि तसेच झाले. चेअरमनपदी निलेश वाणी तर व्हा.चेअरमन पदी संजय ढाके यांची बिनविरोध निवड झाली. वराडसिम सारख्या मोठ्या गावात कोणतीही निवडणूक बिनविरोध होणे साधे काम नाही.त्यासाठी गावाची एकात्मता अबाधीत राखणे गरजेचे असते. यापुढे ही बहुतेक निवडणूका बिनविरोध होवोत अशी अपेक्षा जेष्ठ व सुज्ञ ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.