सुनसगाव ता भुसावळ । वार्ताहर – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील गढी भागातील क्रांतीसुर्य महाराणा प्रताप मित्र मंडळाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यातचा निर्णय घेतला व डिजेच्या तालावर नाचण्या पेक्षा ‘ नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदिप लावू जगी ‘ या अभंगा प्रमाणे नियोजन केले असून दि.११ ते १८ मे या कालावधी दरम्यान श्रीमद् भागवत कथा व संकिर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात दररोज सकाळी काकड आरती ,विष्णूसहस्रनाम ,
सकाळी ९ ते १ हभप राधाश्री ताई जोशी वराडसिमकर यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून कथा श्रवण होत आहे. संध्याकाळी श्रीहरीपाठ व रोज रात्री किर्तनाचा कार्यक्रम होत आहे. आता पर्यंत हभप हरीष महाराज आळंदी ,अक्षय महाराज आळंदी ,सुमित महाराज आळंदी , उमेश महाराज मुक्ताईनगर ,रोहीणीताई महाराज म्हैसवाडी यांची जाहिर किर्तने झाली असून दि.१६ रोजी हभप अँड संदीप महाराज वाघळी ,दि.१७ रोजी हभप शरद पवार महाराज सोयगाव तर १८ दुपारी ३ ते ७ दिंडी सोहळा तर हभप किर्तन केसरी संदीप महाराज आळंदी यांचे रात्री ९ ते ११ या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे.तरी भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रांतीसुर्य महाराणा प्रताप मित्र मंडळ गढी वराडसिम यांनी केले असून तरुणांनी एक नविन आदर्श संकल्पना समाजा समोर ठेवली असून इतर गावातील तरुणांनी या कार्यक्रमाचा आदर्श घ्यावा असे बोलले जात आहे.