वराडसिम उपसरपंचपदी ज्योत्स्ना पाटील बिनविरोध !

0
43

जितेंद्र काटे

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती पचेरवाल यांची नुकतीच निवड झाली त्यानंतर सरपंच भारती पचरवाल यांच्या अध्यक्षतेखाली दि १३ रोजी सभा घेऊन उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली मात्र यावेळी उपसरपंच पदासाठी सौ ज्योत्स्ना विलास पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड झाली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा जंगले ,प्रिती ढाके ,योगीता ढाके , माधुरी वाणी, प्रकाश ठाकूर , विजय कोळी , कैलास कोल्हे , सुभाष कोळी, मंगेश डोळसे , निवृत्ती मावळे ग्रामविकास अधिकारी गौतम वाढे , कारकून चेतन खाचणे , शिपाई गणेश सपकाळे उपस्थित होते तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पोलिस पाटील सचिन वायकोळे , तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ पाटील , रविंद्र मावळे ,राजू कोळी ,विजय पाटील ,धिरज पाटील ,बंटी पाटील , दिलीप धनगर , विशाल झाडखंडे , अशोक झाडखंडे , नाना झाडखंडे , देविदास वंजारी , मुकूंदा वाणी , संजय ढाके ,अजय सपकाळे ,बापू सोनवणे ,राजू जोशी ,अमिन मन्यार , अविनाश वायकोळे ,मनोज राणे , अरुण पाटील व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

नवनिर्वाचित उपसरपंच ज्योत्स्ना पाटील यांच्या सासू के सिताबाई पाटील ह्या वराडसिम गावच्या पहिल्या महिला सरपंच तर सासरे कै रामदास पाटील पोलीस पाटील आणि पती विलास पाटील हे माजी सरपंच होते . त्यामुळे घराण्याला राजकारणाचा वारसा असल्याने वराडसिम गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच ज्योत्स्ना विलास पाटील यांनी सांगितले आहे.

Spread the love