प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातील वराडसीम गावात आगळ्या वेगळ्या पध्दतीने पोळा सण साजरा केला जातो या सणाची साडे तीनशे ते चारशे वर्षांपासून ची परंपरा असून वराडसिम या ठिकाणी पोळा फोडण्याची पद्धत ही वेगळी आहे .गावाला बस स्टॅन्ड जवळ एक गाव दरवाजा आहे. त्या दरवाज्याच्या आजूबाजूला मंदिर – मज्जिद आहे .समोर बाजाराचा ओटा सून त्या ओट्यावर श्री भवानी मातेचे मंदिर आहे. पोळ्याच्या दिवशी सकाळ पासून ग्रामस्थ तिथं नारळ फोडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात नंतर दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास नंदीबैल गावातून वाजत – गाजत काढला जातो या दिवशी शेतकरी आनंददायी दिसतात.सर्जा – राजा बैल वर्षभर राबतो म्हणून पोळ्याच्या दिवशी बैलाची आंघोळ करून सजावट केली जाते त्यांच्या अंगावर कापडी झुली टाकून बैलांच्या शिंगांना रंग लावला जातो तसेच नवे दोर लावून पुरणपोळी चे जेवण दिले जाते व गावातून त्या बैलांना दरवाज्यातून एक फेरी मारली जाते. गाव दरवाजाला अडीच बाय तीन आकाराची खिडकी आहे .आणि साडेतीनशे ते चारशे वर्षांपासून त्या खिडकीतून बैल कुदवण्याची पद्धत आहे. तिथे बैलांची शर्यती लागली जाते कोणाचा बैल खिडकीतून कुदतो त्यांचा एक नंबर , दोन नंबर आलेल्या बैलांच्या मालकाला भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सरपंच ,पोलीस पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष व कमिटी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते बक्षीस दिले जाते . पोळ्या दरम्यान पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने असतो. गावकऱ्यांकडे पाहुणे पोळा पाण्यासाठी बाहेर गावाहून येत असतात तसेच परिसरातील नागरीकांची प्रचंड अशी गर्दी पोळा पाहण्यासाठी असते तसेच पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित असतात.पोळ्याच्या आधी शांतता समितीची सभा ग्रामपंचायत कार्यालयाण घेतली जाते ह्या वर्षी सुद्धा पो नि महेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.१८ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली त्या सभे मध्ये पोळा हा सण साजरा करा मात्र प्राणी मात्रावर दया करा , बैलांना मारू नका.सर्व उत्सव आनंदाने साजरे करा. जो चुकी करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना पो.नि.महेश गायकवाड यांनी दिल्या.यावेळी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला उपस्थित लोकनुक्त सरपंच निलप्रभा पाचपांडे , उपसरपंच वैशाली झारखंडे , ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच प्रकाश ठाकूर, सदस्य शरद सपकाळे, सदस्य इरफान खाटीक , सदस्य विजय पाटील ,सदस्य दीपक ढाके, विजय नंदसिंग पाटील, विजय कोळी ,तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास नाईक यांचे चिरंजीव नितीन पढार ,तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष उत्तम भाऊ सोनवणे ,कुऱ्हा औट पोष्ट चे पोऊनि संजय कंखरे ,पो काँ नखुले ,सचिन पारधी ,गोपीनीय विभागाचे पोहेकाँ वाल्मीक सोनवणे, मेजर विनोद पाटील हे पोलीस कर्मचारी मिटींगला उपस्थित होते , जगदीश पाटील अखिल पिंजारी , गणेश सपकाळे मयूर सपकाळे, विशाल पाटील , मोहित पवार उपस्थित होते .