वराडसिम ग्रामपंचायतीच्या दप्तराची चोरी ?

0
36

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाच्या दप्तराची चोरी झाल्याने ग्रामसेवकांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या बाबत माहिती अशी की मागील आठवड्यात शनिवार रविवार ची सुट्टी असल्याने व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायतीच्या मागील दरवाजाचा उपयोग करून कार्यालयात प्रवेश करुन कपाटाचे लाॅकर तोडून ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे रजिस्टर , फाईल व कागदपत्रे चोरुन नेली.विशेष म्हणजे हे दप्तर चोरुन नेण्याचा उद्देश काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात पीओपी चे काम सुरू केले असल्याने शुक्रवारी कॅमेरे बंद करण्यात आले होते याचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि जर चोरट्यांना चोरी करायची होती तर काही मुद्देमाल लंपास केला असता मात्र कागदपत्रे चोरण्याचा उद्देश काय ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या बाबत तालुका पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या बाबत तक्रार दाखल केली असून तपास कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे बीट हवालदार युनूस शेख व कर्मचारी करीत आहेत.

Spread the love