प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत शासनाने काॅपी मुक्त परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्यामुळे काॅपी बहाद्दरांवर आळा बसला आहे. तालुक्यातील वराडसिम व किन्ही केंद्रावर दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी आहेत त्यामुळे भुसावळ तालुका पोलीसांनी पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी किन्ही व वराडसिम केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे. सध्या परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे वराडसिम केंद्राचे केंद्राध्यक्ष सुशीलकुमार खेडकर व किन्ही केंद्राध्यक्ष एम एम चौधरी यांनी सांगितले आहे. सर्व केंद्रावर पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले जाते आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस व होमगार्ड कर्मचारी लक्ष ठेवून असल्याचे समजते.











