वरणगाव : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी भूमी अभिलेख विभाग व सर्व ऑफ इंडिया या विभागामार्फत नगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “नक्शा प्रकल्पात” वरणगाव नगर परिषदेची निवड करण्यात आली आहे. दिनांक १८/२/२०२५ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचे शुभारंभ श्री. मोगुटराव मगर जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख जळगाव यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजू घेटे उपाधीक्षक भूमि अभिलेख भुसावळ यांनी केले व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सचिन राऊत मुख्य अधिकारी नगर परिषद वरणगाव यांनी केले.









