महात्मा फुले जयंती निमित्त शासकीय सुट्टी द्यावी विविध संघटनांची मागणी

0
37

जळगाव – महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ११एप्रिल रोजी सर्व शासकीय , निमशासकीय , बैंक , कंपनी आदिना सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशा आशयाचे निवेदन विविध संघटनांतर्फे जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना नुकतेच देण्यात आले. सार्वजनिक सुट्टी असल्यास महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त व्यापक कार्यक्रम घेता येतात तसेच विविध शासकीय , निमशासकीय कर्मचारी, अधिकारी त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होउ शकतात असे निवेदनात नमूद केले आहे .

निवेदन देते वेळेस प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ , प्रसिद्ध सत्यशोधकीय नेते मुकुंद सपकाळे , प्रसिद्ध साहित्तीक डॉ मिलिंद बागुल,सत्यशोधक समाजाचे राज्य उपाध्यक्ष सुधाकर बडगुजर ,प्रसिद्ध कवी विजय लुल्हे प्रत्यक्ष हजर होते.

या मागणीस राजेश पाटील ,साहेबराव वानखेड़े ,सुरेश तायड़े , सदाशिव सोनवणे ,अरुण वान्द्रे ,डॉ प्रदीप सुरवाड़कर यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.

या मागणी करीता शासनाचे लक्ष वेधण्या करीता दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी दहा पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहेत . शासनाने ११ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर न केल्यास विविध प्रकारचे आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा सुद्धा या संघटनांतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Spread the love