दिपक नेवे
यावल -साकळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणारे स्वराज्याचे वीर जिवाजी महाले यांच्या जयंती सप्ताहा निमित्ताने जिल्हाभरातील नाभिक समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अ.भा. जिवा सेना जळगांव व श्री जिवा महाले नाभिक बहुउदेदशीय संस्था यावल तसेच अखिल भारतीय नाभिक महामंडळ शाखा- साकळी यांच्या वतीने साकळी येथे सत्कार समारंभ व आदिवासी पाड्यावर जावून फळ वाटपाचा कार्यक्रम दि.७ रोजी घेण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील तसेच येथील श्री भवानी माता बहुउद्देशीय ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष भिका पाटील तसेच उपाध्यक्ष भागवत रावते संचालक अशोक चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील सामाजिक कार्यकर्ते नितीन फन्नाटे, अ.भा. नाभिक समाज महामंडळाचे यावल तालुकाध्यक्ष मनोज सूर्यवंशी, रमेश निंबायत, पितांबर निंबायत या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच आदिवासी पाड्यावर लहान मुले व महिला यांना फळे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या करण्यात आले.
सदर कार्यक्रमात नाभिक समाज शाखा अध्यक्ष संजय चित्ते,उपाध्यक्ष घनश्याम झूरकाळे,खजिनदार रोहिदास चौधरी, सचिव आकाश चित्ते सदस्य सतीश चौधरी,राजू सोनवणे, मधुकर चित्ते, घनःश्याम सुर्यवंशी,सचिन सपकार, पंकज न्हावी,विजय झुरकाळे,वासुदेव न्हावी, प्रकाश चित्ते,अशोक चित्ते दिपक खंबायत यांच्यासह साकळी-शिरसाड व परिसरातील सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.सर्वांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .












