भुसावळ – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अवमान करणारे काँग्रेसचे राहुल गांधी यांचा निषेध करण्यासह सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी भुसावळ तर्फे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून सावरकर गौरव यात्रे निमित्त मोटरसायकल रॅली काढण्यात आली. वीर सावरकर गौरव यात्रेत सावरकरांचा पुतळा असलेला रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच कार्यकर्त्यांनी या यात्रेत मोटरसायकलला रॅली काढत स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे..! आम्ही सारे सावरकर..! भारत माता की जय..! अशा घोषणा देत संपूर्ण वातावरण सावरकरमय केले.
सदरील गौरव यात्रेत भुसावळ शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद, भारत विकास परिषद, हिंदू जागरण मंच बजरंग दल, प्रतिष्ठा महिला मंडळ, जय मातृभूमी मंडळ शंभूराजे मंडळ, एकता मंडळ व भुसावळ शहर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही उस्फूर्त सहभाग घेतला होता.
यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, राजेंद्र चौधरी, शैलेजा पाटील, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे, युवराज लोणारी,प्रमोद सावकारे, किरण महाजन,सरचिटणीस रमाशंकर दुबे,संदीप सुरवाडे, दिलीप कोळी, एड.प्रकाश पाटील,सुनील महाजन, गोलू पाटील, सदानंद उन्हाळे, अतुल झांबरे, प्रशांत पाटील,किरण चोपडे,समाधान पवार, आनंद ठाकरे, प्रशांत निकम, ज्ञानदेव झोपे, संजय भिरुड, गणेश धनगर दिपक तायडे, दिपक सावकारे, गिरीश महाजन,मुकेश पाटील,सतीश सपकाळे अजय नागराणी, निक्की बत्रा,किशोर पाटील,किरण कोलते,देवेंद्र वाणी, बापू महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, पवन बुंदेले, योगेश मांडे, बूथ प्रमुख ,शक्ती केंद्रप्रमुख, सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांडे, प्रसाद पांडे,वासुदेव बोंडे,युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, सुनील सोनवणे, कैलास शेलोडे, पराग भोळे, राजू खरारे,शंकर शेळके, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, जयंत माहुरकर, संजय बोचरे, प्रा विलास अवचार, प्रविण इखनकर,जयंत जंगले, विशाल जंगले,रवी ढगे, गोलू राणे, शिशिर जावळे, चेतन चौधरी केशव गेलानी ,प्रमोद पाटील मुकुंद निमसे चेतन बोरोले, भावेश चौधरी, राहुल तायडे, प्रशांत देवकर,प्रा प्रशांत नरवाडे, अभिजीत मेने, प्रसन्न पांडे,नागेश खरारे, श्रेयस इंगळे, चेतन सावकारे, गोपीसिह राजपुत,लखन रणधीर,लव झाडगे, नंदकिशोर बडगुजर,गौरव आवटे, शेखर धांडे,लोकेश जोशी,मयुर सावकारे,नितीन नाटकर,योगेंद्र हरणे, दिनेश दोधानी, अथर्व पांडे यांच्यासह हजारोच्या संख्येने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी सहभागी झाले होते.