निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा अपघात

0
30

Jalgaon sandesh news network

जळगाव – :विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या एक दिवसाआधीच मोठी घटना घडली आहे. मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे जाताना कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना किनगाव बु. जवळ घडलीय. याबाबतची माहिती माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर उद्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी हे ईव्हीएम व मतदान साहित्यासह आज मंगळवारी (दि. १९) मतदान केंद्रांकडे रवाना होत आहे.

यावेळी जळगाव येथून रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य घेऊन जाताना 11 रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या मीनाक्षी रामदास सुलताने, शिक्षण विस्तार अधिकारी, ज्योती गोपीचंद भादले प्रा शिक्षक,कविता बाविस्कर, लतीफा परवीन चांद खान यांच्या खाजगी गाडीला किनगाव बु. जवळ अपघात झालेला आहे. पुढील उपचाराकरिता सदर महिलांना चोपडा येते हलविण्यात आले आहे.

Spread the love