वर्डी येथील अतिशय गरिबी कुटूंबातील मुलाची कथा संघर्षाची: सशस्र सिमा बल जवान ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत…! 

0
48

हेमकांत गायकवाड

चोपडा:वर्डी, ता.चोपडा- होसले बुलंद हो और कुछ कर दिखानी कि चाहत हो तो’ ‘किस्मत को भी बदला जा सकता है प्रमाणे जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याचे धाडस असले कि अशक्य शक्य करु शकतो.असेच उदाहरण येथील एका सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेले राहुल सुभाष कोळी यांनी विभागा अंतर्गत मर्यादित स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होवुन सब इन्सपेक्टर( उपनिरीक्षक) पदासाठी निवड झाली.व केल्याने होत आहे ते केलेच पाहीजे असे सिध्द करुन दाखविले. लहान पणापासुन अभ्यासु चिकित्सक व चाणाक्ष असलेला राहुल कोळीने प्राथमिक शिक्षण वडी येथे पुर्ण करुन महाविद्यालयीन शिक्षण चोपडा येथे पुर्ण केले. वडील सुभाष हरी कोळी व आई हात मजुरीवर उदरनिर्वाह चालवुन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी धडपडत होते.घरची परीस्थीती हालाकीची असताना देखील राहुल कोळीने जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर प्रथमता सशस्त्र सिमा बल मध्ये भरती होवुन पाच कर्तव्य बजावले व पाच वर्षापासुन एन एस जी कमांडो अहमदाबाद येथे महत्वपुर्ण पदावर खडतर प्रवास असताना देखील अजुन ही स्वप्न अपुर्ण असल्याची खंत मनाशी बाळगुन पाणी, वारा, निसर्ग, कर्तव्य यांच्या सानिध्यात राहुन राहुल कोळीने विभागा अंतर्गत स्पर्धा परीक्षा देत राहीले व यात पहील्या दुसर्या प्रयत्नात नुकतेच जाहीर झालेल्या निकालात सब इन्सपेक्टरपदी निवड पदापर्यंत मजल इन्सपेक्टर पदी निवड झाली. त्यांच्या या निवडीने गावकरी व तरुणांनी त्यांची मिरवणुक काढुन जंगी सत्कार करण्यात आला. राहुल कोळी यांचा यशप्राप्ती पाहुन मोलमजुरी करणारे आई वडीलांच्या डोळ्यातुन आनंदआश्रु तरळले व माझ्या मुलाच्या हातुन न्याय व शिस्तीने समाजसेवा व जनहित घडो असे सुभाष कोळी यांनी बोलताना सांगितले.राहुल कोळी एन एस जी कमांडो म्हणुन महत्वपुर्ण पदावर कार्यरत असल्याने गावकरी व तरुणांनी राहुल यास १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहन करण्याचा मान दिला होता.दोन दिवसानंतर राहुल कोळी यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल लागला त्यात त्यांची उपनिरीक्षक म्हणुन निवड झाली.सशस्त्र सिमा बल जवान, एन एस जी कमांडो ते उपनिरीक्षक पर्यंत असा खडतर प्रवासाने मजल मारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love