प्रविण मेघे यावल
यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील डोंगर कठोरा गावातुन चार दिवसापुर्वी हरवलेल्या विवाहीत तरुणाचे प्रेत मिळाले गावाजवळच्या विहिरीत , यावल पोलीसात घटनेची झाली नोंद . या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , गणेश दिलीप ढाके वय३२ वर्ष राहणार डोंगर कठोरा तालुका यावल हा तरूण दिनांक १८त्रॉव्हेबर पासुन हरवल्याची नोंद यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती . गणेश ढाके याचा मागील चार दिवसापासून सर्वत्र शोध सुरू असतांना अखेर आज २२नॉव्हेबर२०२२ रोजी सकाळच्या सुमारास डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या गावातील विहीरीत त्या हरवलेल्या गणेश ढाके या तरुणाचे प्रेत मृत अवस्थेत मिळुन आले . सदरच्या मरण पावलेल्या तरूणाचे प्रेत ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले गणेश ढाके यांचे प्रेत हे अत्यंत कूजलेल्या अवस्थेत असल्या कारणाने यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख, गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्या उपस्थितीत जागेवरच मृतदेहाचा पंचनामा करून गणेश ढाकेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असुन , याबाबतची धनजय फालक यांनी खबर दिल्यावरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . सदरचा तरुण हा डोंगर कठोरा गावात पत्नी ,दोन मुल , आई या कुटुंबासोबत राहात होता, मोलमजुरी करीत तो आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत असे मात्र त्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कडु शकले नाही . घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे .