विरावली ग्रा प मध्ये होणार मोठा राजकीय भुकंप सरपंच व उपसरपंच असतांना केला पदाचा गैरवापर: देवकांत पाटील यांची बिडीओ कडे तक्रार

0
12

दिपक नेवे

यावल – तालुक्यातील विरावली गावात सन२०२०ते २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रीक निवडणुक निवडून आलेले सरपंच, उपसरपंच , व तीन ग्राम पचांयत सदस्य यांच्या विरुद्ध अतिक्रमण तर उपसरपंच यांचे तीन अपत्य असल्या बाबत तसेच ग्रामपंचायत कारभारात सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हस्तक्षेप करतात या विषयी तक्रारी अर्ज आज दिनांक ८ / १० / २०२१ रोजी शुक्रवारी प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर म्हणून यावल येथे पदभार स्विकारल्या बरोबर विरावली ग्राम पंचायत सदस्य अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील यांनी व पवन युवराज पाटील यांनी विरावली यांनी पंचायत समिती यावल येथे लिखित तक्रारी अर्ज देत कार्यवाहीची केली मागणी केली आहे .सन २०२०व२०२१मध्ये सार्वत्रीक निवडणुकीत निवडून आलेले सरपंच तथा उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य खालील प्रमाणे १) सरपंच कलीमा फिरोज तडवी यांचे व सासरे , पती ,दीर यांच्या परिवारातील सदस्यांचे राहते घर हे सरकारी जागेवर अतिक्रमणीत आहे .उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील यांच्या पती सासरे यांचे राहते घर व दीर यांचे घर व दुकान हे देखील अतिक्रमित जागेत आहे. व त्याच बरोबर उपसरपंच यांना २०२१ नंतर तीन अपत्य असुन .ग्राम पंचायत सदस्य तुषार(मुन्ना) सांडूसिंग पाटील यांचे घर देखील सरकारी जागेवर अतिक्रमण असून, नमुना नंबर ८ मध्ये घर क्र ७८ यात व्हाईटर लावून मूळ क्षेत्र फळात बदल केला आहे. शासकीय दस्तवेज मधून पुरावे नष्ट करणे व ग्राम पंचायत दस्तऐवजा मध्ये त्यांनी सरपंच यांच्या मदतीने मूळ दस्ताऐवजा मध्ये फेरफार केल्याचे गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे ग्राम पंचायत दस्ताऐवजाना धोका निर्माण झाला आहे. ४ ) ग्राम पंचायत सदस्य नथू नामदेव अडकमोल यांचे सरकारी जागेवर घर व दुकानाचे चे अतिक्रमण आहे .५)सदस्य इब्राहीम दलशेर तडवी यांचे व त्यांचे परिवाराचे देखील सरकारी जागेवर अतिक्रमण असून, सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हे नेहमीच ग्राम पंचायतच्या मासिक बैठकीला व इतर ग्राम पंचायतच्या कामात हस्तक्षेप करत असतात. तरी वरील सर्व १ ते ५ सर्व राहणार विरवली तालुका यावल जि.जळगांव यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण व उपसरपंच यांना२००५ नंतर तीन अपत्य व ग्राम पंचायत कामात हस्तक्षेप करणे याची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी व ग्रामपंचायत विरावली सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात अशी मागणी विरावली ग्रामपंचायत सदस्य देवकांन पाटील यांनी केली गटविकास अधिकारी यांचे कडे केलीआहे.

Spread the love