दिपक नेवे
यावल -विरावली येथे दिनेश हेअर आर्ट च्या वतीने प्रो प्रा . दिनेश फुलपगारे यांनी श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष तथा विरावली चे ग्रामपंचायत सदस्य ऍड. देवकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले याप्रसंगी , माजी ग्रा प .सदस्य पवन पाटील , वि का सा चे संचालक गुलाब पाटील , माजी उप सरपंच यशवंतराव पाटील , फ्रुटसेल चे चेअरमन नानाजी पाटील , वि का सा चे संचालक शरद राजपूत , छत्रपती फाऊंडेशन संचालक प्रल्हाद पाटील माजी ग्रा प सदस्य रणधीर पाटील विरावली वि का स सोसायटी चे माजी चेअरमन संजू पाटील, गणेश राजपूत, गिरीष पाटील ,राजेंद्र धनगर , बापू अजलसोंडे , अरमान तडवी ,यशवंत टेलर आदी गावातील नागरिक उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन दिनेश फुलपगारे यांनी केले होते .












