यावल प्रतिनिधि अमीर पटेल
यावल दि. १३ लोडशेडिंगच्या नावाखाली यावल शहरातील वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीज पुरवठा खंडित करताना म्हणजे लोडशेडिंगच्या नावाखाली शहरात मेन रोडवर आणि विकसित भागात एकाच वेळेला ठराविक भागात वीज पुरवठा खंडित करतात तर काही भागात वीजपुरवठा सुरू ठेवतात असा भेदभाव वीज वितरण कंपनी का करीत आहे?याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून वीज वितरण कंपनी वीज पुरवठा खंडित करताना आणि वीज पुरवठा सुरू ठेवताना यावल शहरातील जातीय सलोखा, कायदा सुव्यवस्था,शांतता खंडित करण्याचा कुटील लपंडाव खेळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरात मेन रोडवर महाजन टी डेपो पासून तर बुरुज चौकापर्यंत,आणि जेडीसीसी बँक सुदर्शन चित्र मंदिर परिसरात वीज पुरवठा सुरू असतो तर हा वीज पुरवठा सुरू असताना महाजन टी डेपो पासून दक्षिणेकडे म्हसोबा देवस्थान, महाजन गल्ली,व्यास मंदिर परिसर,अतिप्राचीन महादेव मंदिर परिसर,श्री रेणुका देवी मंदिर परिसरासह भुसावल रोड आई हॉस्पिटल परिसर,फालक नगर, आयेशा नगर , गंगानगर तिरुपती नगर इत्यादी परिसरात २ तास दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत,आणि संध्याकाळी ७: ३० ते ८:३० वाजेच्या दरम्यान, तसेच पुन्हा रात्री ११ते १वाजेच्या दरम्यान,सकाळी पुन्हा अंदाजे १ते२ तास यावल शहरातील वीज वितरण कंपनीचे अधिकारी भेदभाव करून वीज पुरवठा खंडित करीत असतात.वरील दिलेल्या भागातच वीज पुरवठा खंडित का केला जातो आणि ज्या भागात वीज पुरवठा सुरू असतो तिथे वीज पुरवठा खंडित का केला जात नाही?असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी वीज वितरण कंपनी यावल शहरात लोडशेडिंगच्या नावाखाली आपल्या ग्राहकांची आणि जनतेची शुद्ध दिशाभूल करीत असून एकाच वेळेला सर्व ठिकाणी लोडशेडिंग निश्चित अशी वेळ देऊन का करीत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असून याकडे शहरातील समाजसेवक, विविध सामाजिक संघटना, विरोधी गट,सत्ताधारी गट समाजहितासाठी गप्प का?असे सुद्धा बोलले जात आहे.वीज वितरण कंपनीच्या अशा भेद भावामुळे,पक्षपातीपणा मुळे यावल शहरात काही अप्रिय घटना घडल्यास याला वीज वितरण कंपनी जबाबदार राहील यासाठी महसूल,पोलीस,नगरपालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला लेखी समज द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.