अकोल्यामध्ये विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळला असून यात ५ जणांचा दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना
अकोला :- मंगरूळपीर रोडवर दगडपारवा गावाजवळ ही घटना घडली आहे. विटांचा ट्रक दुचाकीवर उलटल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ट्रकमधील चार जणांचा समावेश आहे. अपघातामधील जखमींना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विटांचा ट्रक उलटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी ट्रक सरळ करण्याचे प्रयत्न केला. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.