प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने आवाहन केले होते त्यामुळे अनेक संस्था ,संघटना व कर्मचारी यांनी नागरीकांनी मतदान करावे यासाठी मतदारांची भेट घेतली.
त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार जळगाव जिल्हा कमेटीने संस्थापक अध्यक्ष संतोषकुमार भाटीजी यांनी महाराष्ट्र राज्य कमेटीस आदेश दिला होता. राज्याचे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर सुकलाल पाटील व कार्यकर्ते यांनी बाजारपेठ, डी मार्ट, मार्केट एरीया, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी जाऊन मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले आणि जनजागृती केली.