वराडसिम ग्रामपंचायतीच्या वार्ड रचना जाहीर

0
33

सुनसगाव – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील गृप ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीची वार्ड रचना नुकतीच जाहीर करण्यात आली .जोगलखोरी व वराडसिम धरुन ३ वार्ड असून एकूण १३ सदस्य आहेत .त्यात वार्ड क्रमांक १ मध्ये ३ जागा असून त्यात १) अनुसूचित जाती – सर्वसाधारण.२) नागरिकांचा मागास प्रवर्ग – सर्वसाधारण.३) सर्वसाधारण – स्री राखीव.वार्ड क्रमांक २ मध्ये ३ जागा असून त्यात १) अनुसूचित जमाती – स्री राखीव.२) नागरिकांचा मागास प्रवर्ग – स्री राखीव. ३) सर्वसाधारण.

वार्ड क्रमांक ३ मध्ये २ जागा असून त्यात १) सर्वसाधारण.२) सर्वसाधारण – स्री राखीव. वार्ड क्रमांक ४ मध्ये २ जागा असून त्यात १) अनुसूचित जमाती – सर्वसाधारण.२) सर्वसाधारण – स्री राखीव आणि वार्ड क्रमांक ५ मध्ये ३ जागा असून त्यात १) अनुसूचित जाती – स्री राखीव.२) सर्वसाधारण – स्री राखीव.३) सर्वसाधारण.अशा प्रकारे १३ जागांसाठी निवडणूक होणार असून सरपंच पद हे लोकनियुक्त आहे.या वार्ड रचनेत निघालेल्या आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड झाला असून काही उमेदवारांचे गणित चूकले आहे तर काही नवख्या उमेदवारांना ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी मार्ग खुला झाला आहे.आता येणाऱ्या निवडणुकीत अनेकांनी कंबर कसली असून जो तो कामाला लागला आहे

Spread the love