शासकिय कर्मचार्यांच्या वाहतुक (वाहन) भत्त्यात भरघोस वाढ शासन निर्णयाचे स्वागत

0
49

 प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – शासकिय व इतर पात्र कर्मचार्यांच्या वाहतुक (वाहन) भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्यासाठी शासनाने क्रमांक वाहभ-२०२०/प्र.क्र.०३/२०२०/सेवा-५ नुसार दि.२० एप्रिल २०२२ रोजी निर्णय घेतला असुन ह्या शासन निर्णयाचे विशेष स्वागत ग.स.मधील सेवकांच्या (स्टाफ्) सोसायटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

केंद्र शासनाने सातवा वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने ७ जुलै २०१७ व २ ऑगस्ट २०१७ रोजीच्या आदेशान्वये त्यांच्या कर्मचार्यांच्या निवासस्थानापासुन कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरिल खर्चाची भरपाई म्हणुन सुधारित दराने वाहतुक भत्ता मंजुर केलेला आहे.त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम,२०१९ अन्वये राज्य शासकीय कर्मचार्यांना १ जानेवारी २०१६ पासुन सुधारीत वेतन संरचना लागु करण्यात आलेली असुन तेव्हापासुन कर्मचार्यांच्या वाहतुक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.ह्या वाहनभत्ता वाढीच्या निर्णयामुळे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

दिव्यांग कर्मचार्यांच्याही वाहनभत्त्यात विशेष वाढ.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्यांसह अंध अस्थिव्यंगाने अधु व कण्याच्या विकाराने पीडीत असणार्या तसेच मुकबधीर,श्रवणशक्तीतील दोष असणार्या दिव्यांग कर्मचार्यांना सुध्दा वेतनश्रेणीनुसार विशेष वाहनभत्ता मिळणार असल्याने त्यांच्याही वेतनात खुप मोठी वाढ होणार आहे.

 

Spread the love