ठाण्यात काल गौरव यात्रा पार पडली. यावेळी या गौरव यात्रेत भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
“रोहित पवार कोण? त्याची काय औकात? बोलण्याच्या औकातीचा तो माणूस नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणाले. “राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही गौरव यात्रा आहे.
कोण रोहित पवार? काय त्याची औकात? त्याच्याबद्दल काय बोलायचं? बोलण्याच्या औकातीचा तो माणूस नाही ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही, त्याना बोलण्याचा काही अधिकार नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.