महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक दिवशी नवनवीन मुद्दे समोर येतात. त्यात एक मुद्दा जास्त चर्चिला गेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही मुख्यमंत्री कोण यावरून एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडत नाहीत.
या मुद्यावरून दोघांचा एकमेकांवर हल्लाबोल सुरू आहे. दोन्ही गट या मुद्यावरून एकमेकांना सारखे चिमटे काढत असतात. आता महायुतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदावरून मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी एक पक्का फॉर्म्युला सांगीतला आहे.
आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. आमच्या तीनही घटक पक्षात या मुद्दावरून कोणताही वाद नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. महायुतीमधील गद्दार मुख्यमंत्री कोण होणार हे आता सांगू शकतील का असा सवाल त्यांनी केला. त्यांनी महायुतीवर आगपाखड केली.