शिरागड येथील यात्रोत्सवात भाविकांची उसळली गर्दी ! हॉटेल सासुरवाडी येथे भाविकांनसाठी फराळाचे वाटप.

0
16

यावल – : येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला सोमवार पासुन सूरुवात झाली असून २२ एप्रिल ते २५ एप्रिलपर्यत होमहवन, पुजापाठ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे.

कोळन्हावी व शिरागड दोन्ही गावाच्या तापीनदीच्या उंच टेकडीवर श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. हे दैवत “लहान गड” म्हृणून ओळखले जाते. भाविकांच्या मनोकामना पुर्ण होऊन सुख समृद्धीची देन देणारे हे दैवत आहे.

जळगाव जिल्ह्यात श्री सप्तशृंगी देवीचे लहान गड म्हणून अख्यायिका अशी आहे. शिरागड येथे दाट अरण्य होते, तापी नदीच्या काठावर शांत मनमोहक वातावरण उंच टेकड्या व दऱ्याखोऱ्यात असल्याने येथे ऋषी मुनीचे वास्तव्य होते. येथे जगाच्या हितासाठी व कल्याणासाठी जपतप, होमहवन, पुजापाठ ऋषीमुनी करीत होते, याची वार्ता राक्षस दैत्यासुराला कळाली असता त्याने येथे हाहाकार माजवला.

ऋषीमुनी देवीची आराधना केली असता श्री सप्तशृंगी देवी येथे प्रगत झाली व दैत्यासुराशी तिने युध्द केले. दैत्यासुर जीव वाचविण्यासाठी सैरावैर पळू लागला. सप्तशृंगी देवीने वायुवेगाने त्याच्या पाठलाग करून पहाड पोखरून नाशिक येथील गडावर वणी येथे या दैत्यासुराचा वध केला. याठीकाणी तिने विश्रांती घेतल्याने नाशिक येथील वणीचे गड म्हणून उदयास आले.

 

कोळन्हावी व शिरागड या दोन्ही गावाच्या मध्यभागी ही देवी विराजमान झाली. तेव्हापासून मोठा गड नाशिक येथील वणीचे गड व शिरागडला लहान गड म्हृणून ओळखले जाते. भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून भाविक बाराही महीने देवीच्या दर्शनासाठी येतात.

श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धामणगाव फाट्यापासून व मनवेल मार्गे शिरागड थेट गडापर्यत संस्थामार्फत रस्ता विज व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठिकठिकाणी भाविकांनसाठी फराळाचे वाटप,

गडावर जात असतांना रस्त्यातच सासरवाडी हॉटेल वर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. याठीकाणी भाविकांनसाठी मोठ्या प्रमाणात लाईट रोशनाई त्याच प्रमाणे डिजे सुद्धा लावण्यात आला होता.

याबाबत हॉटेलचे मालक नितीन सपकाळे यांनी सांगितले की दरवर्षी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक माहिला पुरुष दर्शनासाठी पाई येत असतात मध्येच त्यांना कुठेतरी थांबुन विसावा घेता यावा त्यासाठी मि व माझे सहकारी राहुल पाटील, पवन सैंदाणे, खेमराज सोनवणे, सचिन निकम, हार्दिक पटेल, मोहित मोतीरमानी, धिरज बर्डे, आम्ही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनसाठी आमचे हातुन सेवा घडावी यासाठी हा कार्यक्रम ठेवत असतो.

 

Spread the love