यावल चोपडा रोडवर अज्ञात वाहनाने मोटर सायकलच्या भिषण अपघातात साकळीच्या तरूणाचा जागीच दुदैवी मृत्य

0
57

दिपक नेवे

यावल तालुक्यातील साकळी येथील एका तरुणाचा अज्ञात वाहनाने धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास यावल चोपडा मार्गावरील साकळी गावापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या भारत तोलकाटयाच्या जवळ साकळी येथील राहणारा रोहीत अरूण कोळी वय२६ वर्ष हा आपल्या मोटरसायकल क्रमांक एमएच १४जेएन २६८५ वाहनाने साळ्ळीकडुन किनगावकडे जात असतांना एका अज्ञात वाहनाने मोटरसायकला धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात गंभीर दुखापत होवुन जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली आहे . दरम्यान मरण पावलेल्या रोहीत कोळीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन , याबाबत कैलास कोळी यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली , अपघाताची माहीती कळताच पंचायत समितीचे सदस्य दिपक अण्णा पाटील , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह साकळी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने या ठीकाणी उपस्थित होते . सदरच्या अपघातात मरण पावलेला तरूण रोहीत कोळी हा अरूण कोळी यांचा एकुलता एक मुलगा होता .

Spread the love