यावल विस्तारीत वसाहतीच्या श्रीस्वामी केन्द्र आवारातील बाल उद्यानाचे काम अतुल पाटीलांच्या प्रयत्नांनी पुर्णत्वास

0
8

दिपक नेवे

यावल -येथील शहरातील विस्तारीत क्षेत्रातील वसाहती मधील फालकनगरच्या श्री स्वामी समर्थ केन्द्रच्या आवारात सुन्दर व भव्य असा बागीच्याचे कार्य हे पुर्णत्वास आले असुन, याबागीच्या ( उद्याना ) चे कार्यापुर्ण झाल्या मुळे या क्षेत्राच्या नागरीकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी उद्यानाच्या कामास भेट दिली व उद्यानाच्या कामाबाबतची सविस्तर माहीती देतांना प्रस्तुत प्रतिनिधी बोलतांना सांगीतले की मागील अनेक दिवसांपासुन शहराच्या विस्तारीत वसाहतीमध्ये फालक नगर क्षेत्रातील श्री स्वामी समर्थ केन्द्रच्या आवारात लहान चिमूकल्या बालकांसाठी यावल नगर परिषदच्या माध्यमातुन ४५ लाख रुपयांच्या वेशिष्टपुर्ण निधीतुन फालक नगर वस्तीच्या सुन्दरते अधिकभर टाकणाऱ्या आकर्षक अशा उद्यानाचे कार्य हे पुर्णत्वाकडे गेले असुन , या उद्यानात विविध प्रकारची लहान चिमकुल्या बाळांसाठी अत्याधुनिक खेळणे, सहज खेळतांना व्यायाम करता येईल अशी यंत्रे या सुन्दर व आकर्षक उद्यानात लावण्यात आली आहे . या परिसरातील नागरीकांनी मागील काही दिवसापुर्वी या ठीकाणी उद्यान निर्माण व्हावे अशी मागणी नागरीकांनी केली होती या मागणीचा पाठपुरावा माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांच्या प्रयत्नांनी हे शक्य झाल्याने नागरीकांनी पाटील यांचे आभार मानले.

Spread the love