यावल नगर परिषदने पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली : युवक राष्ट्रवादीची निवेदनाद्वारे मागणी..

0
10

दिपक नेवे

यावल येथील नगर परिषदच्या माध्यमातुन राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुललाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल शहर शाखेतर्फे अध्यक्ष हितेंद्र गजरे यांनी नगर परिषद यावल कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे येथे यावल शहरातील मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना नगरपालिकेकडून घरकुलाचे बांधकाम पंधरा दिवसाच्या आत चालू करण्यात यावे, अन्यथा आपले घरकुल रद्द करण्यात येईल अशा नोटिसा लाभार्थ्यांना देण्यात आल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी बांधकाम परवानगी, त्या कामी कागदपत्राची पूर्तता, आर्थिक व्यवस्था, अशा बाबींची पूर्तता करावी लागते. परंतु मागील दीड वर्षापासून या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लाभार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाळू उत्खननावर बंदी असल्याने बांधकाम करण्यास लाभार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे. अशा विविध अडचणींमुळे लाभार्थ्यांची घरकुल बांधकाम सुरुवात झालेली नाहीत. नागरिक बांधकाम करण्यास इच्छुक असून देखील त्यांची नावे नगरपालिकेकडून वगळण्यात येणार असल्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. मंजुर यादीत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा कागदपत्र व इतर आर्थिक अडचणी असलेल्या इच्छुक लाभार्थ्यांना अधिक वेळ मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. ज्या लाभार्थ्यांची कामे सुरू आहेत, अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ते देण्यात यावे. असे निवेदन येथील नगर परिषदेला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र गजरे, समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नरेंद्र शिंदे आदींनी दिले.

Spread the love