यावल शहरातुन तिन लाख रुपये किमतीची कार अज्ञात चोरटयांनी नेली चोरून पोलीसात गुन्हा दाखल

0
14

यावल  प्रतिनिधी 

येथील शहरातील श्रीकृष्ण नगरातून एकाची ३ लाख २० हजार रूपये किंमतीची तवेरा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, प्रकाश भास्कर पारधे (वय-४२) रा. श्रीराम नगर, यावल हे खासगी कॉन्ट्रॅक्टर आहे. खासगी काम करून आपल्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करतात. १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता त्यांनी यावल येथील श्रीकृष्ण नगरातील प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना कार्यालयासमोर त्यांची मालकीची (एमएच ०४ ईएफ २६५८) क्रमांकाची तवेरा कार पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ३ लाख २० हजार रूपये किमतीची तवेरा कार चोरून नेल्याचा प्रकार शनिवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला. त्यांनी परिसरात कारचा शोध घेतला परंतू कार कोठेही आढळून आली नाही. सायंकाळी ५ वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आयपीएस अधिकारी आतिश कांबळे यांच्या आदेशावरून सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत करीत आहे.

Spread the love