यावल येथील एसटी आगारातील सर्व कामगारांनी अचानक संप पुकारल्यानंतर प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होत असुन , खाजगी वाहतुक करणाऱ्यांची मात्र चांदी झाल्याचे दिसुन आले . आज येथील एसटी यावल आगारात विविध संघटनांच्या माध्यमातुन अचानक दुपारपासुन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी पुनश्च संपाला सुरू करण्यात आली असुन या संपात यावल एसटी महामंडळाचे सुमारे ३५०च्यावर विविध पदावरील आगारातील कर्मचारी यात सहभागी झाले आहे . यावल आगारातुन सर्व कर्मचारी दुपारपासुन अचानक राज्यव्यापी संपात सहभागी झाल्याने यावेळी यावलच्या बस स्थानकावर आलेल्या चोपडा-रावेर या रावेर आगाराच्या बसच्या चालक-वाहकांना येथील आगाराच्या कर्मचाऱ्यांनी बस येथेच सोडून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले असता त्यांनी आपण रावेर आगारात गेल्यानंतर या संपात सहभागी होण्याचे सांगितले यावर कामगारांनी गांधीगिरी करत त्यांना पुष्पहार अर्पण करीत महिलांनी त्यांना बांगड्या अर्पण केल्या ही बस चोपडा येथून निघाल्याने या बसचे चालक वाहक अचानक पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होऊ शकले नव्हते तरीही त्यांनी रावेर आगारात गेल्यानंतर आम्ही संपात सहभागी होणार असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांशी बोलतांना सांगितले . अचानक यावेळी ऐन दिवाळी या सणासुदीच्या काळात पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठया प्रमाणावर हाल झाले. मात्र या संपाचा गैरफायदा अवैद्य प्रवासी वाहतुक करणारी मंडळी घेतांना दिसुन येत आहे .