यावल प्रतिनिधि अमीर पटेल
यावल – : शहरात झालेल्या महिलेच्या हत्येबाबत प्राथमिक माहितीनुसार शहरातील काजीपुरा परिसरात आज सायंकाळी नाजिया जलिल काझी ( वय ३५ ) रा. काझिपूरा या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला यात हि महिला गतप्राण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनाम्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शहरात एकच खळबळ उडाली आहे यावल येथील ग्रामिण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासनी करून महिलेस मृत घोषित केले आहे.
सदर प्रकरणा मध्ये संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे .