यावल तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही तरीही गावठी दारूसह गुटका पानमसालाची सर्रास विक्री

0
14

दिपक नेवे

यावल येथील काल गुरुवारी चोपडा मार्गावर असलेल्या एका ठीकाणी छापा राज्य उत्पादन टाकुन ६३ हजार रूपयांचे गावटी दारूचे रसायन व एका चारचाकी मोटर वाहन जप्त करून एका संशयीताला ताब्यात घेतले आहेत या कार्यवाही मुळे तालुक्यात गावठी दारूची मोठया प्रमाणावर बेकाद्याशीर दारूची विक्री होत असते हे सिद्ध झाले असुन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे यामुळे दिसुन आले , तसेच यावल तालुक्यातअन्न व औषद्य प्रशासन विभागाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षीत कारभारामुळे तालुक्यात सर्वत्र महीन्याला लाखो रुपयांच्या गुटक्याची सर्रासपणे विक्री होत आहे त्याचे काय असा प्रश्न नागरीक करीत आहे . दरम्यान यावल तालुक्यात मागील तिन ते चार वर्षापासून शेजारच्या गुजरात आणी मध्यप्रदेश या परप्रांतातुन विविध खाजगी वाहनाने गुटक्याची मोठया प्रमाणात आयात केली जाते व सर्रासपणे तालुक्यातील यावल शहर फैजपुरशहर व ईतर मोठी गावे या ठीकाणी सुमारे तिस ते चाळीस लाखांचा गुटका पानमसाला मोठया प्रमाणावर विकण्यात येत आहे . अगदी सहज कोणत्याही पानटपरी असो किंवा गल्लीबोळातील छोटयातली छोटी किराणा दुकान या ठीकाणी काही मिळो न मिळो मात्र गुटका पानमसाला हा आर्वाजुन मिळत असतो , सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार खालपासुन तर वर पर्यंत सर्वांना वेळेवर हप्ते मिळत असल्याने याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे . राज्य उत्पादनची काल झालेली कार्यवाही म्हणजे अर्थकारणाचे हिशोबाचे गणीत चुकत्याने उशीरा सुचलेले शहाणपण असेच म्हणावे की काय असा प्रश्न नागरीक करीत आहे,दरम्यान आज ही यावल शहरात आणी तालुक्यात मोठया प्रमाणात गावटी दारू व पनीची दारू खुलेआम शहरातील विविध ठिकाणी व गावागावात राजरोसपणे विक्रीला जात असल्याने अनेक अल्पवयीन मुलं ही व्यस्नाधीन होत असुन त्यांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे . त्यावेळी राज्यउत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई ही नुसता देखावा असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

Spread the love